निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्था एकवटल्या

शहरविकासासाठी योग्य निर्णय घेण्यास राजकीय पक्ष, नेते यांना भाग पाडणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहररातील सुमारे ४० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची शनिवारी प्राधिकरणातील सावरकर सदनात बैठक झाली. या बैठकीत राजकीय पक्षांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गोग्य असे निर्णय घेण्यास भाग पाडायचे असा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना काय हवे याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून येत्या निवडणुकीत राजकीय पक्षांना त्यावर भूमिका स्पष्ट करायला लावायची आणि त्याप्रमाणे पुढील पाच वर्षे त्याचा पाठपुरावा करायचा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या सुमारे ४० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत एकत्र आले होते. सध्या शहराला भेडसावत असलेल्या पाणी, स्वच्छता, रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला, पर्यावरण यासारख्या क्षेत्रात नागरिकाणा हितावह ठरतील अशा सुधारणा करून घेण्यासाठी महापालिका प्रशासन, राजकीय नेते यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी दबावगट म्हणून या पुढे एकत्रित काम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. प्राधिक़रणातील स्वातंत्रवीर सावरकर सदनात शनिवारी कोरोनाचे सर्व नियम पाळून ही बैठक पार पडली. शहरातील नागरिकांनाही या उपक्रमाविषयी सूचना देता येणार आहेत. त्यासाठी पुढील लिंकवर जाऊन अधिक माहिती घ्यावी https://surveheart.com/form/61da70b728821d18acb09cff
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्था एकवटल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्था एकवटल्या Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ ११:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".