देहूगाव : देहू नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबिज केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तब्बल १४ उमेदवार विजयी झाले आहेत. २ अपक्षांना विजय मिळाला असून भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना, काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर देहूगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक झाली. दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी बुधवारी पार पडली.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती.
देहू नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत
Reviewed by ANN news network
on
१/१९/२०२२ १०:२२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: