लोणावळा : नाताळ आणि साप्ताहिक सुट्ट्या एकत्र आल्यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांनी लोणावळ्यात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शनिवारी लोणावळ्याजवळ बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक संथगतीने होत आहे.
त्यातच बोरघाटात रस्तादुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक अधिकच मंदावली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून पर्यटकांच्या वर्दळीने पर्यटननगरी फुलून गेली आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे मार्गिकेवर बोरघाट पोलीस चौकी, दस्तुरी, अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा दरम्यान तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या.वाहतूक संथ गतीने सुरु आहे. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
लोणावळ्याजवळ बोरघाटात वाहतूक मंदावली
Reviewed by ANN news network
on
१२/२५/२०२१ १०:५३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: