नामवंत खेळाडूंमुळे शहराच्या नावलौकिकात भर : महापौर माई ढोरे

पिंपरी : नामवंत खेळाडूंच्या खेळातील विशेष प्राविण्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली असल्याचे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहरातील विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणा-या खेळाडू तसेच क्रीडा पर्यवेक्षक, प्रशिक्षकांचा सत्कार महापौर कक्षात महापौर माई ढोरे यांचे हस्ते पार पडला यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, क्रीड़ा समिती सभापती उत्तम केंदळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, सुरेश भोईर, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, सुषमा शिंदे उपस्थित होते. सत्कारार्थींमध्ये पहिल्या वर्ल्ड ऑनलाईन मार्शल आर्टस् टेक्निक स्पर्धेतील सिल्व्हर मेडल मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू कु. भक्ती राजेंद्र कांबळे हिचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या क्रीड़ा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणातंर्गत विविध खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शहरात नामवंत खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील संघटक प्रशिक्षक यांचा महत्वाचा सहभाग असतो. त्यांचा देखील आज सन्मान करण्यात आला. त्यामध्ये क्रिकेट खेळातील क्रीडा संघटक प्रदीप वाघ, शाम तेलंग, मुकेश गुजराथी, विजय गावडे, भुपेंद्र मारणे, सुनिल मुथ्था, सदाशिव गोडसे, राजाराम गावडे, वसंत ठोंबरे, नरेंद्र डी कदम, बुद्धीबळ पर्यवेक्षक विवेक भागवत, चंदू थवानी, सुमंत कदम, किसन गायकवाड, ज्ञानेश्वर फेंगसे, मधुकर शिरोळे, राजू कोतवाल, आणि बॉक्सिंग पर्यवेक्षक टी रमेश यांचा समावेश आहे.
नामवंत खेळाडूंमुळे शहराच्या नावलौकिकात भर : महापौर माई ढोरे नामवंत खेळाडूंमुळे शहराच्या नावलौकिकात भर : महापौर माई ढोरे Reviewed by ANN news network on १२/२१/२०२१ १०:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".