पिंपरी : पिंपरी ते फुगेवाडी या 7 किलोमीटर अंतराच्या मेट्रोमार्गाची तपासणी नवी दिल्ली येथील मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग नुकतीच केली.
त्यानंतर त्यांनी महामेट्रोने केलेल्या काम व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे लवकरच त्यांच्याकडून प्रवासी वाहतुकीस ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यची शक्यता पुणेमेट्रोकडून वर्तविली जात आहे.
गर्ग व त्यांच्या पथकाने संपूर्ण मार्गावर ट्रॉली तसेच, मेट्रोत बसून मार्गाची बारकाईने तपासणी केली. तसेच मार्गावरील फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर व पिंपरी चिंचवड महापालिका भवन या सर्व 5 मेट्रो स्थानकांची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. त्यांचा हा पाहणी दौरा रविवार ते मंगळवार असे 3 दिवस चालला.
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाची तपासणी
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२१ १०:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: