पिंपरी : काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. भारतीय स्वातंत्र लढ्यात काँग्रेस पक्षाचे योगदान आणि काँग्रेसच्या विचाराने भारावून गेलेल्या कार्यकर्त्यांचे बलिदान देशातील नागरीक कधीही विसरू शकत नाही.असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी मंगळवारी केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्धापदिनानिमित्त मंगळवारी (दि. 28 डिसेंबर) सायंकाळी संत तुकाराम नगर पिंपरी येथे चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम, माजी नगरसेवक माऊली थोरात, मारुती भापकर, सद्गुरु कदम, विश्वास गजरमल, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, मानव कांबळे, संदीपान झोंबाडे, बाबा कांबळे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, ज्येष्ठ नागरीक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच कैलास कदम आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
पिंपरी येथेकाँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास चांगला प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२१ १०:३७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: