नेत्रतज्ञांच्या परिषदेमध्ये फेको स्लाइस मोतीबिंदू शस्त्रक्रिया तंत्राचे सादरीकरण

डॉ संजय टेकावडे यांचा डॉ तात्याराव लहाने यांच्याहस्ते सत्कार 
पुणे : पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक परिषदेमध्ये मोतीबिंदूवरील प्रभावी शस्त्रक्रियेसाठी फेको स्लाईस  या नव्या तंत्राचे सादरीकरण परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष  डॉ संजय टेकावडे यांनी  केले.यावेळी डॉ टेकावडे यांच्या नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री  डॉ तात्याराव लहाने यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.रॉयल कॅनॉट बोट क्लब मध्ये या परिषदेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी हे सादरीकरण झाले. 

'फेको स्लायसर' या उपकरणाच्या माध्यमातून फेको स्लाईस या तंत्राची शस्त्रक्रिया मोतीबिंदूवर केली जाते.या नव्या तंत्राची शस्त्रक्रिया सुलभ आणि जास्त सुरक्षित आहे. रुग्ण लवकर बरा होतो आणि शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही गुंतागुंत होण्याची शक्यता या तंत्रामुळे कमी होते',असे डॉ संजय टेकावडे यांनी सांगितले. नुकतेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कार्यशाळेत देखील या तंत्राचे लाईव्ह सादरीकरण करण्यात आले होते.डॉ टेकावडे यांना याआधी महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या परिषदेमध्ये या तंत्राबद्दल गौरविण्यात आले होते.

डॉ टेकावडे हे पुण्यात नेत्रसेवा,नेत्र शल्यचिकित्सा क्षेत्रात तीस वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव सर्जरी कमी खर्चात करण्याची अनेक तंत्रे शोधली असून त्याची विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरणे केली आहेत.त्यामध्ये 'युरोपियन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी' या परिषदेचाही समावेश आहे.पुण्यात लक्ष्मीनारायण सिनेमागृह जवळ त्यांचे सुसज्ज नेत्र रुग्णालय  आहे
नेत्रतज्ञांच्या परिषदेमध्ये फेको स्लाइस मोतीबिंदू शस्त्रक्रिया तंत्राचे सादरीकरण नेत्रतज्ञांच्या परिषदेमध्ये फेको स्लाइस मोतीबिंदू शस्त्रक्रिया तंत्राचे सादरीकरण Reviewed by ANN news network on १२/१५/२०२१ ०४:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".