सोमवार, २० डिसेंबर, २०२१
रमाई आंबेडकर स्मारकासाठी घोषित केलेल्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
पिंपरी : रमाई आंबेडकर यांच्या पिंपरी येथील नियोजित स्मारकासाठी महापालिकेच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या जागेवर असलेले अतिक्रमण हटवून तेथे सीमाभिंत उभारावी अशी मागणी शहरातील विविध पक्षसंघटनांनी केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर माई ढोरे यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील विविध पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर ढोरे यांची भेट घेऊन त्या जागेवर अतिक्रमण आणि अनुचित प्रकार होत असल्याच्या तक्रारी मांडल्या.
या चर्चेच्यावेळी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, स्विकृत सदस्य राजेंद्र कांबळे, सहशहर अभियंता मकरंद निकम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह बापूसाहेब गायकवाड, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, सुधाकर वारभुवन, स्वप्नील कांबळे, सिंकदर सुर्यवंशी, देवेंद्र तायडे, गुलाब पानपाटील, संतोष जोगदंड, राजन नायर, धम्मराज साळवे, विनोद गायकवाड, धुराजी शिंदे, रमेश चिमुरकर, कमल कांबळे, के. एम. बुक्तर, लिंबराज कांबळे, रुहीनाज शेख, अशोक सरतापे, संतोष शिंदे, विजय ओहोळ, प्रकाश बुक्तर, हौसराव शिंदे, सम्राट जकाते, मनोज गजभार, दशरथ ठाणांबीर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा