सोमवार, २० डिसेंबर, २०२१

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ओमिक्रॉनग्रस्त रोगमुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्वच्या सर्व दहा ओमिक्रोनग्रस्त रुग्ण बरे झाले असून सध्यातरी शहरात एकही ओमिक्रोन रुग्ण नव्याने आढळलेला नाही, तसेच यामुळे शहरातील एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही अशी माहिती सहाय्यक अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी सोमवारी दिली. पिंपरी चिंचवड शहरात रविवारी शहराबाहेरून उपचारासाठी शहरात आला त्याची ओमिक्रोन चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर महापालिका हद्दीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही डॉक्टर गोफणे म्हणाले. शहरात आतापर्यंत ओमिक्रोनचे ११ रुग्ण आढळले आहेत. त्यातील १० जण रोगमुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे.शहरात आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील अशा एकूण एक हजार तीन जणांची तपासणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा