पुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांच्या त्रासामुळे पक्षाला रामराम ठोकला असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.पक्षातील काही रिकामटेकडे नेते साथ देत नसल्यामुळे आणि पक्षातील लोक बदलत नसल्यामुळे मी स्वतः बदलण्यासाठीच पक्षातून बाहेर पडले अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.मनसेमध्ये गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहे. पक्ष अध्यक्षांकडून आणि कार्यकर्त्यांकडून देखील निस्वार्थ प्रेम मिळाले आहे. परंतु काही नेते बदलत नसल्यामुळे स्वतः बदलण्यासाठी हा निर्णय़ घेतला आहे. पक्षातील नेत्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन वारंवार माहिती दिली असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या तसेच राजीनामा हा वैयक्तिक कारणामुळे दिला आहे. ज्या पक्षात १४ वर्ष काम केले त्या पक्षाला सोडताना फार वेदना होत आहेत. परंतु पक्षातील निस्वार्थ प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेहमी ऋणात राहीन. राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात प्रवेश केला होता. राज ठाकरे यांच्या भाषणांनी प्रभावित झाल्यामुळे मनसेमध्ये प्रवेश केला होता. ते नेहमी माझ्या ह्रदयात राहतील असेही रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा