आळंदी : प्रतिवर्षाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी आलेल्या विठुरायाच्या पादुकांनी रविवारी पंढरपूरकडे प्रयाण केले. या पादुकांच्या पालखीचे वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी परंपरेने स्वागत केले.
याप्रसंगी सोहळा प्रमुख ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. नामदेव महाराज वासकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज बुरांडे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक ह.भ.प बाळासाहेब आरफळकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, दिघी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर गुळूंजकर यांचा शाल ,श्रीफल, पुष्पगुछा,उपरणे देवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, काशिनाथ तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
गेल्या आठ वर्षांपासून श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूरहून श्री विठ्ठलाच्या पादुका माउलींच्या भेटीला येतात. या पादुका पालखी सोहळ्याने परतीचा प्रवास रविवारी सुरू केला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, काशिनाथ तापकीर यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी भाविक व वारकरी यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
माऊलींच्या भेटीनंतर विठुरायाच्या पादुका पंढरपूरकडे
Reviewed by ANN news network
on
१२/०५/२०२१ ११:०२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: