आंबेडकरी जनतेने गटतट बाजूला ठेऊन एकत्र यावे : ना.रामदास आठवले

लोणावळा : आंबेडकरी दलित जनतेने गटतट बाजूला ठेऊन समाजाच्या हितासाठी एकत्रित यावे आणि सर्वानुमते अध्यक्ष निवडावा. मला अध्यक्षपदात स्वारस्य नाही मात्र मी गटतट संपविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोणावळा येथे केले. लोणावळा शहरात उभारण्यात आलेल्या माता रमाई आंबेडकर महिला सांस्कृतिक भवन लोकार्पण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरन कामाच्या भूमिपूजन कर्यक्रमासाठी ते आले होते. मोदी सरकार हे संविधानाला मानणारे सरकार असून या काळात देशात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झाले असल्याने आरपीआय भाजप सोबत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. उत्तरप्रदेशसह अन्य पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका भाजप सोबत आघाडी करून लढणार असल्याचेही ते म्हणाले. पुढं बोलताना आठवले यांनी राज्यातील महाआघाडी सरकार फार काळ टिकणार नसून येत्या मार्च, एप्रिल महिन्यात काहीतरी नवीन घडेल किंवा सरकार पडेल अशी भविष्यवाणी करीत शिवसेनेने सत्तेसाठी चुकीचा निर्णय घेतला असून भाजप, शिवसेना आणि आरपीआय ने एकत्र येऊन फडणवीस यांना मुख्यमंत्री करीत सरकार स्थापन करावं असा सल्ला दिला. याशिवाय शेतकरी कायदे हे शेतकèयांच्या हिताचे होते मात्र काही शेतकरी नेत्यांनी शेतकèयांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करीत राज्यात एसटी कर्मचाèयांच्या मागण्यांना आरपीआयचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या सभेत माता रमाई आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीनं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचा लोणावळा भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, जेष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे, देविदास कडू, सुधीर शिर्के, संजय घोणे, निखिल कवीश्वर, ललित सिसोदिया, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, अर्पणा बुटाला, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते. चौकट : मोदींना हलवणे येèयागबाळ्याचे काम नाही - रामदास आठवले काँग्रेस पक्ष हा २०१२४ पासून खिळखिळा झाला असून ममता बॅनर्जी यांच्या कडून सुरू असलेल्या तिसèया आघाडीच्या प्रयत्नांना फार यश येणार नाही. २०२४ मध्ये सर्व पक्ष एकत्र आले तरी त्याने फार फरक पडणार नाही, मोदींना हलवणे हे येèयागबाळ्याचे काम नाही असं प्रतिपादन रामदास आठवले यांनी लोणावळ्यात केले.
आंबेडकरी जनतेने गटतट बाजूला ठेऊन एकत्र यावे : ना.रामदास आठवले आंबेडकरी  जनतेने गटतट बाजूला ठेऊन एकत्र यावे : ना.रामदास आठवले Reviewed by ANN news network on १२/०५/२०२१ १०:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".