पिंपरी : विकासात्मक कामे करण्यासाठी समन्वय आणि सातत्य महत्त्वाचे असते. अशावेळी अध्यात्माची जोड मिळाल्यास काम करण्यासाठी अधिक ऊर्जा प्राप्त होते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे श्री मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळमळा परिसरामध्ये करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांच्या कामाचा लोकार्पण समारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, स्विकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सभापती गजानन चिंचवडे, माजी नगरसदस्य शंकर जगताप, राजू गोलांडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, नितीन देशमुख, क्षेत्रिय अधिकारी अभिजित हराळे आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
सुमारे ६० लाख रुपये खर्च करुन चिंचवड येथे श्री मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळमळा परिसरामध्ये मुंख्य स्टेज, पदपथ, सिटींग गॅलरी आणि १४ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तसेच इतर कामे करण्यात आली आहेत या कामांचे लोकार्पण आज करण्यात आले.
अध्यात्माची जोड मिळाल्यास विकासकामे करताना अधिक उर्जा प्राप्त होते : महापौर ढोरे
Reviewed by ANN news network
on
१२/२५/२०२१ १०:४५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: