मंगळवारी प्राधिकरणात साहित्य संमेलन

पिंपरी : नगरसेविका शर्मिला बाबर, शब्दरंग साहित्य कट्टा (प्राधिकरण) आणि रुपेरी कडा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, पेठ क्रमांक 25, निगडी प्राधिकरण येथे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे असून महापौर उषा उर्फ माई ढोरे उद्घाटक आहेत. संमेलनात सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका शैलजा मोरे, डॉ. गिरीश आफळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, मनोरंजन, स्वगत, नाट्यछटा, एकपात्री सादरीकरण, अभिवाचन आणि काव्यकट्टा या विनाशुल्क असलेल्या साहित्यसत्रांचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन निमंत्रक राजेंद्र बाबर यांनी केले आहे.
मंगळवारी प्राधिकरणात साहित्य संमेलन मंगळवारी प्राधिकरणात साहित्य संमेलन Reviewed by ANN news network on १२/२१/२०२१ १०:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".