पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने तयार केलेला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा
राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रथम एकसदस्यीय पद्धतीने, आणि त्यानंतर त्रीसदस्यीय पद्धतीने आराखडा तयार करण्याचा आदेश पालिकेला दिला होता. त्यानंतर महापालिका आणि नगरपरिषदांमधील सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीनसदस्यीय पद्धतीने नवी प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर रोजी महापालिकेला दिले.परंतु काम पूर्ण न झाल्याने महापालिकेने आराखडा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मागितली. त्यावर आयोगाने ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.त्यानुसार पालिकेने आराखड्याचे काम पूर्ण केले; व आराखडा आयोगाला सादर केला.
आता निवडणूक आयोग त्यात काही बदल असतील तर ते करण्यास आयोग महापालिकेला फर्मावेल. त्याप्रमाणे त्यात बदल करून पालिका आयोगाला आराखडा फेरसादर करेल. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हरकती, सूचना मागविल्या जातील. त्यावर सुनावणी घेतली जाईल, त्यानुसार आराखड्यात बदल करून अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाईल.
या निवडणुकीत असणार
◆ ४६ प्रभाग
◆ १३९ नगरसेवक संख्या
◆ ६९ पुरुष नगरसेवक
◆ ७० महिला नगरसेविका
पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रभागरचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर
Reviewed by ANN news network
on
१२/०७/२०२१ ०६:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/०७/२०२१ ०६:२९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: