पिंपरी : युवकांच्या कलागुणांना काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकालात आणि युपीए एक आणि दोन सरकारमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना राज्यसभेत सन्मानपूर्वक सदस्य केले. काँग्रेसची विचारधारा घरोघरी पोहचविण्याचे काम पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम करीत आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उमेदवार चांगली लढत देतील असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘काँग्रेस चषक 2021’ भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सोनल पटेल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव संगिता तिवारी, कविचंद भाट, नरेंद्र बनसोडे, विरेंद्र गायकवाड, उमेश खंदारे, विश्वास गजरमल, सद्गुरु कदम, निर्मला कदम, अभिमन्यू दहितुले,इस्माईल संगम, दिनकर भालेकर, राजाराम भोंडवे, हरिश डोळस, गौतम ओव्हाळ, छाया देसले, नंदा तुळसे, स्वाती शिंदे, सायली नढे आदी उपस्थित होते.
चौकट
‘काँग्रेस चषक 2021’ या स्पर्धेत एकूण 82 संघानी सहभाग घेतला होता. सोनल पटेल यांच्या हस्ते प्रथम विजेत्या श्रीकांत देसाई युनायटेड संघास ‘काँग्रेस चषक 2021’ आणि पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते 44,444/- रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच व्दितीय विजेता संघ भक्ती शक्ती मित्र मंडळ ‘काँग्रेस चषक 2021’ आणि 33,333/- रुपयांचा धनादेश, तृतीय विजेता राहुलभाऊ ताकभाते संघ यांना ‘काँग्रेस चषक 2021’ आणि 22,222/- रुपयांचा धनादेश आणि चतृर्थ विजेत्या दिप इलेव्हन संघास ‘काँग्रेस चषक 2021’ आणि 11,111/- रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
मॅन ऑफ द सिरीज अनुराग मोहिते, बेस्ट बॅटमन प्रथमेश ओरसे, बेस्ट बॉलर पार्थ पवार यांना स्मृती चिन्ह आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व संघांना सन्मान चिन्ह आणि अंतिम चार संघांतील खेळाडूंना टि शर्ट, मेडल देऊन गौरविण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चांगली लढत देतील : सोनल पटेल
Reviewed by ANN news network
on
१२/३०/२०२१ ०९:५०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: