मोदींनी देश विकायला काढला; शहरातील भाजप रुग्णालये विकत आहे : कैलास कदम यांची टीका

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशातील फायद्यात असणारे सार्वजनिक उद्योग विकायला काढले आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील त्यांचे अनुयायी शहरातील सर्वसामान्य नागरीकांना आवश्यक असणा-या वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करुन ठेकेदारांची पोटे भरण्याचा उद्योग करीत आहेत. शहरातील नागरीकांच्या करातून भोसरी येथे सुसज्ज असे शंभर बेडचे नविन रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे सर्व काम पूर्ण झाले असून हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी विखंडीत करावा. अशी मागणी शहारातील नागरीकांच्या वतीने आपणास करीत आहोत. अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिला. शुक्रवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व साधारण सभा सुरु असताना कदम यांनी प्रेक्षक गॅलरीत आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून नविन भोसरी रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी रद्द करा आणि वैद्यकीय सेवेत सुधारणा करा अशा घोषणा दिल्या. तत्पूर्वी कदम यांनी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले. या पत्रात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी सर्व्हे. क्र. १ येथे सुसज्ज असे शंभर बेडचे नविन भोसरी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे सर्व काम पूर्णर् झाले असून हे रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी ताबडतोब उपलब्ध करुन द्यावे. तसेच नविन भोसरी रुग्णालयाबाबत यापुर्वी मनपाच्या सर्व साधारण सभेत हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी विखंडीत करावा. अशी मागणी शहारातील नागरीकांच्या वतीने आपणास करीत आहोत. अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. माजी मंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांनी दूरदृष्टी ठेऊन शहरातील सर्वात मोठे ७५० बेडचे वायसीएम रुग्णालय उभारले. या रुग्णालयातून आतापर्यंत लाखो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येची गरज पाहून मनपाच्या सर्वसामान्य नागरीकांच्या करातून आणखी काही रुग्णालय उभारली गेली. यामध्ये सुसज्ज असे नविन भोसरी रुग्णालय आहे. या शंभर बेडच्या रुग्णालयात ९० बेड ऑक्सीजनसह आणि १० बेड आयसीयूुचे आहेत. येथे तीन ऑपरेशन थिएटर आहेत. लिक्वीड गॅस आणि ऑक्सीजन जनरेट प्लँट अशा अत्याधुनिक सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य नागरीकांच्या करातून उभारलेले रुग्णालय प्रशासन खासगी तत्वावर ठेकेदारांची पोटे भरण्यासाठी सत्ताधारी देत आहेत. ज्या नागरीकांनी घाम गाळून, कष्ट करुन कर भरले आहेत आणि भाजपाच्या भुलथापांना बळी पडून ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे त्यांच्याशी ही प्रतारणा केल्यासारखे आहे. नागरीकांना वैद्यकीय सेवासुविधा देणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे प्रमुख म्हणून तुमची प्रथम जबाबदारी व कर्तव्य आहे असेही पत्रात म्हटले आहे.
मोदींनी देश विकायला काढला; शहरातील भाजप रुग्णालये विकत आहे : कैलास कदम यांची टीका मोदींनी देश विकायला काढला; शहरातील भाजप रुग्णालये विकत आहे :  कैलास कदम यांची टीका Reviewed by ANN news network on १२/२४/२०२१ १०:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".