शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

तळेगाव येथील आरोपींना ५ दिवस पोलीसकोठडी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील तरुणाचा बुधवारी रात्री त्याच्या चुलतभावाने आपल्या एका साथीदारासह मिळून खून केला होता. तळेगाव पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली होती. या आरोपींना शुक्रवारी वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली. या घटनेमध्ये बुधवारी दशांत अनिल परदेशी वय 17 रा. ६७५ रविवार पेठ, भोई आळी. तळेगाव दाभाडे याचा खून झाला होता. त्या प्रकरणी कमलेश सुरेश परदेशी वय २० वर्ष (मयताचा सख्खा चुलत भाऊ) प्रकाश संजय लोहार वय १९ वर्ष दोघेही रा.खडक मोहल्ला, भोई आळी, तळेगाव दाभाडे, यांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी अधिक तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. ती ग्राह्य धरून न्यायालयाने दि. २८ डिसेंबर पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली;अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा