पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथे लिंगायत समाजाची शिवकैलास दफनभूमी आहे या दफनभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी जागा शिल्लक राहिले नसल्यामुळे गेले काही दिवस नागरिक मशानभुमी बाहेरील फुटपाथ फोडून तेथे दफनविधी करू लागले होते हा प्रकार लक्षात येताच माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि महापौर ढोरे यांना निवेदन दिले होते
या निवेदनात दफनभूमी परिसरातील झाडेझुडपे काढावीत, दफनभूमी क्र. १ येथील अंत्यविधी करण्यात आलेल्या जागेतील माती काढुन ती सुयोग्य ठिकाणी टाकुन या जागेत चार फुट नवीन पोयटा माती भरावी अथवा आहे त्या मातीवरच चार फुट नव्याने माती भरावी म्हणजे वरील सर्व परिसरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येचे निराकरण होईल. अशा आशयाचे पत्र दिले होते.
त्यानंतर महापालिका प्रशासनाने दफनभूमी परिसरातील जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली, चार फूट अतिरिक्त पोयटा माती टाकण्यास सुरवात केली आहे. मनपाने तातडीने दखल घेतल्यामुळे मोरवाडी येथील लिंगायत दफनभूमी स्वछ आणि प्रशस्त होईल असे मारुती भापकर यांनी आयुक्त आणि महापौरांचे आभार व्यक्त करताना सांगितले.
भापकर यांच्या प्रयत्नामुळे पिंपरीतील लिंगायत दफनभूमीची समस्या मार्गी
Reviewed by ANN news network
on
१२/०१/२०२१ ०२:४०:०० PM
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: