पिंपरीत महापालिका फुलेसृष्टी उभारणार


पिंपरी : पिंपरी चौकात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून तेथे फुलेसृष्टी उभारली जाणार आहे. 

या कामाचे भूमिपूजन राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते  दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. शहरात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा नाही. स्त्री शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाईंचे कार्य अनमोल आहे. सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विशेषतः महिला वर्गास प्रेरणादायी ठरेल. शहराच्या नावलौकिकातही भर पडणार आहे. पुतळ्याच्या बाजूस जिना व लिफ्ट असणार आहे.

पुतळ्याच्यावर आरसीसीमध्ये घुमट असणार आहे. पुतळ्यासमोर 350 लोकांसाठी ओपन एअर थिएटर, स्टेजमागे एलईडी स्क्रीन, कलाकारांसाठी विश्रांती कक्ष, बगीचा कांस्य धातूचे उठाव शिल्प, भिंतीसाठी बांधकाम, जीआरसी कामामध्ये वाडा संकल्पना, पूर्ण परिसरासाठी पेन्सिल संकल्पनेतील सीमाभिंत, स्वच्छतागृह आदी बाबी निर्माण करून सुशोभीकरण केले जाणार आहे.या माध्यमातून महात्मा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.


पिंपरीत महापालिका फुलेसृष्टी उभारणार पिंपरीत महापालिका फुलेसृष्टी उभारणार Reviewed by ANN news network on ११/२२/२०२१ ०१:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".