पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली येथील नगरसेविका साधना तापकीर आणि त्यांचे पती सचिन तापकीर यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात चऱ्होली परिसरातील गोरगरीब-कष्टकरी नागरिकांच्या मदतीसाठी तापकीर दाम्पत्याने पुढाकार घेतला. त्याची दखल विविध सामाजिक संस्था-संघटनांनी घेतली.
पिंपरी- चिंचवडमधील एखाद्या नगरसेवकाने आपल्या प्रभागात एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीकरण मोहीम राबविल्याची हे एकमेव उदाहरण आहे. त्यांच्या कार्याबद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
कोविड किट वाटप, आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, मोफत कोविड चाचणी, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे, बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर बेड उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.
कोरोना काळात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागत होत्या. त्या परिस्थितीत तापकीर दांपत्याने प्रभागात मोफत लसीकरण मोहीम राबवली. त्याला सर्वसामान्य नागरिक, सोसायटीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे तब्बल ६ हजार ५० नागरिकांना मोफत आणि सुलभपणे लसीकरण करून घेता आले. त्याची दखल घेत त्यांना राज्यपाल यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
या विषयी बोलताना साधना तापकीर म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना संकटकाळात लोकांच्या मदतीला धावून जाणे, हे आपले कर्तव्य आहे. भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दीड दोन वर्षांत आम्ही विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. या सन्मानामुळे आणखी सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
Reviewed by ANN news network
on
११/२२/२०२१ ०२:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: