रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

तळेगावात श्री डोळसनाथ महाराजांचा जन्मोत्सव साजरा

तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा मंदिरात उत्साहाने भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होत आहे. या जन्मासोहळ्यानिमित्त दि.२० ते २७ नोव्हेंबर पर्यत महापूजा, काकडआरती, हरिपाठ, भजन, जागर कीर्तनसेवा आणि महाप्रसाद आदि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.दि.२७ रोजी रात्री १० ते १२.३० पर्यत ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते यांच्या कीर्तनाने जन्मासोहळा साजरा झाला. या संपूर्ण सप्ताहात मंदिरामध्ये व परिसरात रांगोळ्या,फुलांची सजावट, विजेची रोषणाई करण्यात आली होती. या दिवशी कोकणामधून श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीला जाणाèया दिंड्यांचे आगमन होते. त्यांचेकडून नामाचा गजर केला जातो. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोरील पटांगणात आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाच्या रूपाने भोजन दिले जाते. व सकाळी चहापान करून दिंड्या पुढील प्रवासाला मार्गस्थ होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा