रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१
तळेगावात उमाबाई दाभाडे यांना आदरांजली
तळेगाव दाभाडे : स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाई दाभाडे यांच्या २६८ व्या पुण्यतिथी निमित्त दाभाडे घराण्याच्या वंशजांनी समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
येथील बनेश्वर मंदिरा जवळ सरसेनापती श्रीमंत उमाबाई दाभाडे सरकार यांची समाधी आहे. त्यांची पुण्यतिथी असल्याने या समाधी स्थळावर सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे यांची प्रथम पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी इतिहास व्याख्याते अँड विनय दाभाडे, लेखक कृष्णा दाभाडे, पतसंस्थेचे व्यवस्थापक बबनराव दाभाडे,उपाध्यक्ष सविता दाभाडे,रुपाली वि.दाभाडे,शबनम खान,प्रतिष्ठानचे संचालक आनंद दाभाडे, संजय सखाराम दाभाडे, भाजपचे प्रभारी वैभव कोतुळकर,अमीन खान,महेश सोनपावले, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अँड विनय दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे यांनी सरसेनापती श्रीमंत उमाबाई दाभाडे सरकार यांच्या कार्याचा आढावा मनोगतामधून घेतला.त्यांनतर सर्वांनी श्रीमंत उमाबाई दाभाडे यांच्या स्मृतीला अभिवादन करून पुष्पांजली समर्पित केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा