जगावं कसं करावं काय ? कॉंग्रेसचा भाजपला प्रश्न


पिंपरी  : देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसची महत्वपुर्ण भुमिका आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची शेती आणि औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी काँग्रेसने केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रासह देशभरात स्वातंत्र्योत्तर काळात पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. समाजातील सर्व घटकांनाबरोबर घेऊन काँग्रेसने देशाचा विकास केला. आता भारत देश भकास करण्याचे काम भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी केली.
गुरुवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदम यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी म्हाळसाकांत चौक ते तहसिलदार कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर कवीचंद भाट,  शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितूले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सज्जी वर्की, विजय ओव्हाळ, रवी नांगरे,ज्ञानेश्वर मलशेट्टी, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे, बाबा बनसोडे, निखिल भोईर आदी उपस्थित होते.
मोर्चानंतर तहसिलदार कचेरी बाहेर सभा घेण्यात आली. कदम पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात चारशे रुपयाला मिळणारा गॅस एक हजार रुपयांपर्यंत गेला आहे. पेट्रोल पन्नास रुपये लिटर होते ते आता शंभरीपार झाले आहे. गॅसवर मिळणारे अनुदान केंव्हाच बंद झाले आहे. रोज वाढत जाणा-या महागाईमुळे देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे उद्योग व कारखाने बद होत आहेत. त्यामुळे रोज हजारो युवक बेरोजगार होत आहेत. तहसिलदार गीता गायकवाड यांना कदम आणि प्रतिनिधींनी निवेदन दिले.

जगावं कसं करावं काय ? कॉंग्रेसचा भाजपला प्रश्न जगावं कसं करावं काय ? कॉंग्रेसचा भाजपला प्रश्न Reviewed by ANN on ११/२५/२०२१ १०:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".