खडकी : बोपखेल गावातून लष्कराच्या हद्दीमधून दापोडीकडे जाणारा रस्ता 2015 साली लष्कराने बंद केला. त्यावेळी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यासाठी बोपखेल मधील भाग्यदेव घुले यांनी नुकतीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.
वेळी राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या प्रदेश सरचिटणीस शिल्पा बिडकर, विनेश भोजे, दत्ता घुले, दत्तात्रय घुले, रोहिदास जोशी, अमित टिळेकर, मारुती मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
बोपखेल ते दापोडी हा रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद केला. त्या मुळे बोपखेलच्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन केले होते. हे आंदोलन चिघळले व त्यात अनेक स्त्रिया, ७४ वयोवृद्ध व १०२ पुरुष व १३ लहान मुले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली होती पवार यांनी त्यावेळचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना कॉल करून सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती त्यानंतर या गावासाठी पर्यायी रस्ता देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली मात्र या आंदोलनामुळे ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे कायम आहेत ते मागे घेण्यासाठी घुले प्रयत्नशील असून या संदर्भातच त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली वळसे पाटील यांनी या प्रकरणी योग्य अहवाल सादर करण्याची सूचना पोलिस आयुक्तालयाला केली आहे
बोपखेल रस्ता आंदोलकांवरील खटले मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळ्से पाटील यांना साकडे
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ ०९:४१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: