पिंपरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या प्रभारी सोनल पटेल यांच्या उपस्थितीत
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची बैठक नुकतीच पिंपरी येथे पार पडली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष कैलास कदम होते.
सुरूवातीस जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पटेल व कदम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सोनल पटेल म्हणाल्या, “देशातील जनता त्रस्त झाली आहे, लोकांना पश्चाताप होतो आहे. भाजपाने जनतेची लूट करत फूट पाडण्याचे उद्योग आधीपासूनच सुरूच ठेवले आहेत पण आता जनतेला सर्व लक्षात आले आहे व काही ठिकाणी देशात मोदींचा पुतळा रावणाप्रमाणे जाळण्यात आला आहे. आपण आता चांगली निवडणूक तंत्रे वापरत सेक्टर प्रमुख, बूथ प्रमुख वार्ड मोहल्ला कमिटी करत स्क्षूम बांधणी करत वाटचाल ठेवली पाहीजे. कार्यकर्त्यांची स्तर रचना योग्य केली तर विजय
दूर नाही हे जाणून कामाला लागा, लोकांत जा, आवाहन करा व सहाभागी करून घेऊन लढा उभारा”,
कैलास कदम म्हणाले, “आगामी काळात जनतेसमोर येणारी सर्व आव्हाने पेलण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊन कामाला लागले पाहीजे आपापल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या वर आंदोलने करत व पक्ष संघटनेचे जाळे शहरभर पसरवून आपणांस पक्षास गतवैभव प्राप्त करुन द्यायचे आहे, महानगरपालिकेतील सत्ताधा-यांनी भ्रष्टाचाराच्या परिसिमा गाठल्या आहेत व स्थायी समिती लाचलुचपत विभागाने रंगेहात सभापतींनी रंगेहात पकडून ही भाजपाने पुन्हा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवत भ्रष्टाचाराचे खुले समर्थनच केले आहे व यामुळे शहर भाजपाचा खरा चेहरा जनते समोर आला आहे, माझा भाजपाला सवाल आहे की यावर भाजपा नेते गप्प का? ते जरी गप्प असले तरी आता जनता आता गप्प बसणार नाही व त्यांना आगामी निवडणूकीत जागा दाखवून देईल. पण आपण देखील सर्वानी जनते पर्यंत पोहचून ही परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले पाहीजे”
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सचिव गौतम आरकडे यांचा सोनल पटेल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, माजी महापौर कविचंद भाट, श्यामला सोनवणे व गौतम आरकडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यातून सुंदर कांबळे, स्वप्निल बनसोडे, रवी नांगरे, उमेश बनसोडे, सज्जी वर्की, विश्वास गजरमल, विरेंद्र गायकवाड, दिनकर भालेकर, सज्जी वर्की, सतिश भोसले, एकनाथ मुंडे आदिनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे
श्यामला सोनवणे, मोहन बिडलान, विरेंद्र गायकवाड, सुंदर कांबळे, ॲड. उमेश खंदारे, विश्वास गजरमल, सदगुरू कदम, अभिमन्यू दहितुले, लक्ष्मण रूपनर, के एम रॅाय, तिरूमल, इस्माईल संगम, माऊली मलशेट्टी, शोभा पगारे, विजय ओव्हाळ, रवी नांगरे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन नरेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष हरीनारायण यांनी केले.
मनपातील भ्रष्टाचारबाबत भाजपने जनतेला उत्तर द्यावे- कैलास कदम.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ १२:४२:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: