पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदी



पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  कार्यालयात  आणि सर्व शाळा, सर्व दवाखाने यामध्ये तसेच पालिकेच्या कार्यक्रमात प्लॅस्टीक वापराबाबत घालण्यात आलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारीदिले.  आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

          दि. २३ मार्च २०१८ चे अधिसूचनेद्वारे प्लॅस्टीक हे अविघटनशील असल्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत प्लॅस्टीकचे उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आलेली आहे.   त्या अनुषंगाने महापालिकेच्या मुख्य कार्यालयात तसेच क्षेत्रीय कार्यालये, शाळा, दवाखाने व इतर सर्व इमारतींमध्ये प्लॅस्टीक पिशव्या आणि प्लॅस्टीकपासून निर्मित वस्तूंच्या वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

          पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करण्यात यावा असे आदेशात नमूद केले आहे.  या आदेशानुसार सर्व कार्यालयांमध्ये पुनर्वापर न होणा-या प्लॅस्टीकचा वापर होणार नाही याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी.  या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागप्रमुखांची असून विभागामध्ये कोठेही प्लॅस्टीकचा वापर झाल्याचे आढळून आल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आदेशाद्वारे देण्यात आला आहे.   

पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदी पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदी Reviewed by ANN news network on ११/२२/२०२१ ०७:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".