उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बॉम्ब

पिंपरी चिंचवड शहरातील वजनदार राजकारणी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू उद्योजक शंकर जगताप यांच्या पिंपळे सौदागर येथील कार्यालयावर मंगळवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पेट्रोल बॉम्ब फेकून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला.

शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ही घटना घडली त्यावेळी ते कार्यालयात उपस्थित होते. मंगळवारी दुपारी एका  दुचाकीवरून जगताप यांच्या कार्यालयाजवळ तिघेजण आले. त्यांनी आपल्यावळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले.

त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्‍ट्रिक डीपीजवळ पडला. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बॉम्ब उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बॉम्ब Reviewed by ANN news network on ११/२३/२०२१ ०६:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".