पिंपरी : शहरातील सेक्टर नं २२ संग्रामनगर, त्रिवेणीनगर व अंकुश चौक या भागात राहणाऱ्या १०४ कुटुंबांना महानगरपालिकेच्या वतीने घरे मिळणार आहेत. नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यासाठी पाठपुरावा करत होते.
घरे मिळाल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडा सभापती उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, संजय वाघमारे व लाभार्थी उपस्थित होते.
सेक्टर नं २२ (संग्रामनगर- त्रिवेणीनगर- अंकुश चौक( या झोपडपट्टी भागात ३६५ घरे आहेत. २००९ साली JNNURM प्रकल्पाअंतर्गत १९३ नागरीक पात्र ठरले होते.२०११ साली दोन सोसायट्याचा लकी ड्रॉ करण्यात आला होता. या प्रकल्पाविरोधात याचिका दाखल झाल्यामुळे तीन इमारती तशाच पडून राहिल्या. आयुक्त राजेश पाटील रुजू झाले आणि त्यांच्या समोर नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी घराचा प्रश्न उपस्थित केला. आयुक्त नवीन असल्यामुळे त्यांच्या समोर बैठका व प्रश्न मांडण्यात दोन महिने वेळ गेला.एका झालेल्या बैठकीत राजेश पाटील यांनी तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी एस आर ए प्रकल्प, पी एम वाय योजनांतर्गत किंवा न्यायालयात याचिका दाखल करू असे आश्वासन दिले होते.नगरसेवक प्राध्यापक केंदळे व घोलप हे वारंवार आयुक्त व महापौरांकडे पाठपुरावा करत होते. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२१ रोजी १६० पैकी १०४ लोकांचे लकी ड्रॉ द्वारे विठ्ठल नगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. नगरसेवक केंदळे, नगरसेविका घोलप यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.
नगरसेवक काळामध्ये गोरगरिबांना घरे मिळवून देऊ शकलो याचा आनंद झाला आहे.१०४ कुटुंबाचे विठ्ठल नगर येथे पुनर्वसन झाले आहे अजून अपात्र राहिलेल्या कुटुंबाचेही पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागातील नागरिकाला पुनर्वसनाद्वारे घर मिळवून दिल्यामुळे याचा अनुभव व आमदार आमदार महेश दादा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. अनेक वर्ष झाली आयुक्त व महापौर यांच्याशी पत्रव्यवहाराद्वारे व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करत होतो याचा आज चीज झाल्यासारखं वाटत आहे.सहकार्य केल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांना धन्यवाद देतो.
- नगरसेवक उत्तम केंदळे
बारा वर्षानंतर १०४ जणांना मिळाली हक्काची घरे
Reviewed by ANN news network
on
११/२३/२०२१ ०६:१४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२३/२०२१ ०६:१४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: