2 किमी पदपथासाठी 38 कोटींची उधळपट्टी : नगरसेवक तुषार कामठे



पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका 2 किलोमीटर पदपथाच्या रुंदीकरणासाठी तब्बल 38 कोटी रुपये उधळणार असून याला भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी विरोध दर्शविला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बी.आर.टी.एस विभागाने राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार पदपथ रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. याला तब्बल 38 कोटी रुपये खर्च येणार आहे. महापालिका या पदपथाला सोन्याचा मुलामा देणार आहे का? असा संतप्त सवाल कामठे यांनी केला आहे.
पदपथाचे रुंदीकरण केल्याने रस्ता अरुंद होईल व वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागेल असा आक्षेपही कामठे यांचा आहे.
महापालिकेच्या बी.आर.टी.एस. विभागाने राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार पदपथ विकसित करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे ३७ कोटी ८७ लाख ८७ हजार १८१ इतका खर्च येेेणार आहे.
सांगवी फाटा ते रावेत या रस्त्यावर चारचाकी, टू व्हीलर वाहनांची प्रचंड गर्दी असते. या रस्त्यावर फूटपाथ विकसित केल्याने रस्ता अरुंद होणार आहे. सध्यस्थितीत वाहनाची संख्या पाहता फूटपाथ रुंदीकरण केल्यास वाहनाच्या अपघाताचे प्रमाण वाढणार आहे असे कामठे यांचे म्हणणे आहे.

 

2 किमी पदपथासाठी 38 कोटींची उधळपट्टी : नगरसेवक तुषार कामठे 2 किमी पदपथासाठी 38 कोटींची उधळपट्टी : नगरसेवक तुषार कामठे Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:५३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".