खाटूश्याम दर्शनावरून परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील ९ भाविकांचा कोटा येथे रस्ते अपघातात मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मंगळवारी रात्री ते प्रवासासाठी निघाले होते आणि खाटूश्यामचे दर्शन घेऊन सर्व जण महाराष्ट्राकडे परतत होते. परतीच्या प्रवासादरम्यान रविवारी मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास कोटा परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला यातील एका जीपने पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की जीपच्या पुढील भागाचा संपूर्ण चक्काचूर झाला. या वाहनात लहान मुले आणि प्रौढ मिळून १५ ते १६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय व प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ७ जखमींवर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच धुळे आणि परिसरात शोककळा पसरली आहे. कोटा येथील स्थानिक प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले असून, मृतदेह लवकरात लवकर महाराष्ट्रात पाठवण्याची व्यवस्था करणे तसेच गंभीर जखमींवर योग्य वैद्यकीय उपचार होऊन त्यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी समन्वय साधला जात आहे.
Labels: Kota Road Accident, Dhule Devotees Accident, Khatushyam Temple Pilgrims, Rajasthan Accident News, Maharashtra Devotees Tragedy, Kota Medical College Hospital, Highway Safety, Astra News Network
Search Description: Read the news report on a tragic road accident in Kota, Rajasthan where a jeep carrying pilgrims from Dhule, Maharashtra returning from Khatushyam temple rammed into a parked truck at 2 AM, killing 9 and critically injuring 7.
Hashtags: #KotaAccident #DhuleNews #RajasthanAccident #Khatushyam #MaharashtraNews #RoadSafety #TragicNews #AstraNews
Reviewed by ANN news network
on
११/२२/२०२६ ०५:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: