संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा; २६ नोव्हेंबरला आयोजन
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
तरुण आणि भावी पिढीमध्ये स्वातंत्र्याच्या मूल्यांपासून संविधानाने दिलेल्या जबाबदारीपर्यंतचा विचार रुजवून त्यांना वारसा व पर्यावरण रक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
या निमित्ताने गडावर स्वच्छता व पर्यावरण जनजागृती अभियान, सामूहिक संविधान उद्देशिका वाचन व प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनाच्या आग्रहाप्रती अभिवादन तसेच सांस्कृतिक व लोककला कार्यक्रम असे विविध उपक्रम होणार आहेत. या उपक्रमांतर्गत राज्यातील ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, कोकणकडा मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने किल्ले रायगड येथे सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या विशेष सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे.
Labels: Raigad Fort News, Constitution Day, Siddhesh Kadam, MPCB, Raigad Ropeway, Maharashtra News
Search Description: Special event 'Gadancha Maan, Samvidhanacha Sanman' to be held at Raigad Fort on November 26, 2026, for Constitution Day, featuring cleanliness drives, preamble reading, and cultural programs.
Hashtags: #RaigadFort #ConstitutionDay #SiddheshKadam #MPCB #MaharashtraNews #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२६ १०:३७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: