एम.पी.डी.ए. कारवाईत फरार असलेला सराईत गुन्हेगार निखिल कांबळे जेरबंद!

 

पुणे : खराडी पोलीस ठाण्याकडील एम.पी.डी.ए. (स्थानबद्धता) कारवाईत फरार असलेला आणि येरवडा व लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत तथा तडीपार गुन्हेगार निखिल मधुकर कांबळे (वय २२ वर्षे, रा. प्रज्ञासागर बुद्ध विहाराजवळ, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) याला लक्ष्मीनगर पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. सरगम हॉटेलजवळील गाडीतळ परिसरात पत्र्याच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या निखिल कांबळे याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, येरवडा आणि लक्ष्मीनगर परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तपास पथकाला तडीपार व फरार गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सहायक निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि अंमलदार गस्त घालत असताना अंमलदार राहुल परदेशी, अक्षय शिंदे आणि किरण भागीत यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, तडीपार गुन्हेगार निखिल कांबळे हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येरवड्यातील सरगम हॉटेलजवळील गाडीतळ परिसरात आला आहे.

बातमी मिळताच तपास पथकाने त्या परिसरात वेढा घालून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच निखिल कांबळे याने एका पत्र्याच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला पाठलाग करून जागेवरच पकडले. त्याला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात आणून दप्तराची पाहणी केली असता, त्याच्यावर पोलीस आयुक्तांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश पारित केले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याला पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई अप्पर आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, उपायुक्त परिमंडळ ४ चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, निरीक्षक गुन्हे अमर कदम, निरीक्षक गुन्हे दिलीपकुमार वेडे, सहायक निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि अंमलदार मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, किरण भागीत, श्रीनाथ कांबळे, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, सूरज ओंबासे, भिमराव कांबळे, अमोल वायाळ, नितीन धायगुडे, कादिर शेख, दत्तात्रय शिंदे व सचिन कुचेकर यांनी केली.

  • Labels: Pune Police, Lakshminagar Police Station, MPDA Arrest, Absconding Criminal Arrested, Nikhil Kamble, Yerwada Pune, Crime News

  • Search Description: Pune Lakshminagar police arrested wanted MPDA criminal and externed offender Nikhil Kamble while he tried to flee in Yerwada.

  • Hashtags: #PunePolice #LakshminagarPolice #Yerwada #MPDA #WantedCriminal #PuneCrime #CrimeNews #MaharashtraPolice

एम.पी.डी.ए. कारवाईत फरार असलेला सराईत गुन्हेगार निखिल कांबळे जेरबंद! एम.पी.डी.ए. कारवाईत फरार असलेला सराईत  गुन्हेगार निखिल कांबळे जेरबंद! Reviewed by ANN news network on ११/०५/२०२६ ०४:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".