ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोजा यांना ‘अनुरव साहित्य प्रेरणा पुरस्कार’ प्रदान; ‘अनुरव’ दिवाळी अंकाचेही प्रकाशन
आनंदनगर: कलानुरव कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने अनुरव साहित्य कला, क्रीडा अकादमीचा ८ वा वर्धापनदिन सोहळा रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कलाश्री भवन, सिंहगड रोड येथे पार पडला. या सोहळ्यात स्व. गुंडेराव कुलकर्णी व स्व. लक्ष्मणराव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘अनुरव साहित्य प्रेरणा पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार बाबू डिसोजा यांना प्रदान करण्यात आला, तसेच अनुरव प्रकाशनाच्या ‘अनुरव’ दिवाळी अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.
हा पुरस्कार जयंत भिडे, मंदाताई नाईक, रवींद्र नेर्लेकर, मिलिंद पानसरे, अतुल कुलकर्णी आणि कलानुरव कार्यकारिणीच्या हस्ते बाबू डिसोजा यांना प्रदान करण्यात आला. रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
समारंभादरम्यान अनुरव संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीत सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. पं. रवींद्र यादव यांनी गायनरंग मैफलीतून सादरीकरण केले.
संस्थेचे प्रास्ताविक अध्यक्षा डॉ. अनुजा कल्याणकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन डॉ. सतीश कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला अनुरवच्या साहित्यिक परिवारासह संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आणि संगीत रसिक उपस्थित होते.
Labels: Anurav Sahitya Prerana Puraskar, Babu D'Souza, Anurav Diwali Ank, Sinhagad Road Pune, Kalashri Bhavan, Cultural Event
Search Description: Senior writer and journalist Babu D'Souza receives the Anurav Sahitya Prerana Puraskar at the 8th anniversary event in Anandnagar, Pune, alongside the release of the Anurav Diwali edition.
Hashtags: #PuneNews #MarathiSahitya #DiwaliAnk #SinhagadRoad #CulturalEvent #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
११/२४/२०२६ ०७:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: