डीलिमिटेशन विधेयकाला शिवसेना (उबाठा) चा विरोध; करदात्यांवर बोजा व मतदारसंघ रचनेवरून आदित्य ठाकरे यांची टीका
मुंबई: मतदार पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयक देशाच्या हितामध्ये नसून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या विधेयकाला विरोध करत असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. खासदारांची संख्या वाढवण्याऐवजी लोकप्रतिनिधींचा निधी वाढवावा, असा मुद्दा मांडत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली.
माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मतदार पुनर्रचनेमुळे मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जागांच्या संख्येत मोठा फरक पडू शकतो. सभागृहात खासदारांची संख्या सुमारे ८५० पर्यंत नेल्यास प्रत्येक खासदाराला बोलण्यास पुरेसा वेळ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी खासदारांचे वेतन, भत्ते आणि सुविधांचा सर्व बोजा करदात्यांवर पडेल, असे नमूद केले. त्याऐवजी खासदार व आमदारांचा निधी वाढवता येईल, असे त्यांनी सुचवले.
मतदारसंघ व प्रभागांच्या सीमा बदलून भाजप निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की, कितीही जागा केल्या तरी भाजप निवडणुका जिंकणार नाही. २०२३ मध्ये महिला आरक्षण कायदा मंजूर झाला होता, मात्र वाढीव संख्येच्या प्रमाणात महिलांच्या प्रतिनिधित्वाचे गणित पाहता महिलांची फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
इतर पक्षांच्या भूमिकेबाबत विचारले असता, आपण कोणाच्याही पक्षाच्या भूमिकेवर भाष्य करणार नसून मतदार पुनर्रचना कायद्यामुळे देशाचे काय नुकसान होऊ शकते, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य देत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Labels: Aaditya Thackeray, Delimitation Bill, Shiv Sena UBT, Womens Reservation, Maharashtra Politics, Parliament Session, Marathi News
Search Description: Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray opposes the delimitation bill, raising concerns over taxpayer burden, constituency boundaries, and representation proportions.
Hashtags: #AadityaThackeray #DelimitationBill #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #WomensReservation #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२६ ०५:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: