डीलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून काँग्रेसकडून उघड नाराजी व्यक्त


मुंबई / नवी दिल्ली: मतदार पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून महाराष्ट्र काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवून शरद पवार यांना दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देत, आता तोच पक्ष परिसीमन कायद्याच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने समाजमाध्यम 'एक्स'वरील (ट्वीट) पोस्टमधून केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शरद पवार यांना वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला असता, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली आणि काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत पाठिंबा दिला.

या पोस्टमध्ये पुढे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने नमूद केले आहे की, “आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार, सुप्रिया सुळे  आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत”. दरम्यान, या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संमिश्र सूर दिसून येत असून, जितेंद्र आव्हाड यांनी समर्थनाचे संकेत दिले असले तरी विधेयकाचा मसुदा पाहिल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली आहे.

३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेसने या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली असताना, महाविकास आघाडीतील या दोन्ही घटक पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


  • Labels: Maharashtra Congress, NCP Sharad Pawar, Delimitation Bill, Sharad Pawar, Supriya Sule, Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, MVA Politics, Marathi News

  • Search Description: Maharashtra Congress questions NCP (SP) over its stance on the Delimitation Bill in a social media post, reminding Sharad Pawar and Supriya Sule of Congress's support during the Rajya Sabha elections.

  • Hashtags: #MaharashtraCongress #NCPSP #DelimitationBill #SharadPawar #SupriyaSule #MVAPolitics #MarathiNews

डीलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून काँग्रेसकडून उघड नाराजी व्यक्त डीलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवरून काँग्रेसकडून उघड नाराजी व्यक्त Reviewed by ANN news network on ११/२८/२०२६ १०:५१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".