पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरात मालमत्तेच्या जुन्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणि गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. शाहीद फारुख घोडके (वय ३०, रा. ९३१, भवानी पेठ, लक्ष्मी मार्केटजवळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी रात्री फिर्यादी यांचा मुलगा व साक्षीदार भवानी पेठेतील मटण मार्केट येथील आदमाने बिल्डिंगजवळ गेले असताना, जुन्या वादातून चार अनोळखी इसमांनी संगनमत करून हवेत धारदार हत्यारे फिरवून दहशत माजवली. फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली होती, तसेच साक्षीदारास मारहाण केली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), ११७(२), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) सह विविध कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी शाहीद घोडके हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. युनिट १ चे अंमलदार प्रमोद जगताप व उमेश शेलार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भवानी पेठेतील त्याच्या राहत्या घरी सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते,उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धिरज राऊत आणि अंमलदार प्रमोद जगताप, संतोष नागरे, बाबा दांगडे, रेवन्नाथ भुजबळ, संतोष अनुसे व उमेश शेलार यांच्या पथकाने केली आहे.
Labels: Pune Crime Branch, Unit 1, Samarth Police Station, Attempt to Murder, Pune Police
Search Description: Pune Crime Branch Unit 1 arrests a wanted accused absconding for two years in an attempt to murder case registered at Samarth Police Station.
Hashtags: #PuneCrimeBranch #PunePolice #AttemptToMurder #CrimeNews #Unit1

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा