गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई
३० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ५ कडील अंमलदार नासिर देशमुख आणि सुधीर सोनवणे यांना उरुळी देवाची परिसरातील आदर्श नगर येथे अवैध सुगंधित तंबाखू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट ५ च्या पथकाने घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यावर अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी सरकाटे, पूजा बगाडे आणि मोहिते यांना पाचारण करण्यात आले.
घरावर धाड अन् ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
उरुळी देवाची येथील घर क्रमांक ११-४४१३, सर्व्हे क्र. २२/२, आदर्श नगर या ठिकाणी संयुक्त पथकाने छापा टाकला. तेथे बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू तयार करत असताना सुशीलसिंग विश्वनाथ तोमर (वय २६) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (वय २३, दोघे रा. तारेनी, मोरेना, मध्य प्रदेश) हे मिळून आले.
घटनास्थळावरून सुगंधित तंबाखूचे ५९ बॉक्स, पाऊच पॅकिंग मशीन, रोझ वॉटर, मेंथॉल बॉक्स, ग्लिसरॉल कॅन आणि अमूल कंपनीचे १०८० चीजचे डबे असा एकूण ३१,९१,६०८ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
एफडीए अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नारायण सरकाटे यांच्या फिर्यादीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे वरिष्ठ निरीक्षक संदीपन पवार, सहाय्यक निरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक अभिजित पवार, अंमलदार नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, अमर चव्हाण, प्रताप गायकवाड, अकबर शेख, परमेश्वर कदम, शहाजी काळे, राहुल गोसावी, राहुल ढमढेरे, नेत्रिका अडसूळ, जयश्री भालेराव, मयुरी पालवे, श्रीदेवी फाळके तसेच एफडीए अधिकारी नारायण सरकाटे, पूजा बगाडे व मोहिते यांनी केली.
Labels:
Pune Crime Branch,FDA Raid Pune,Illegal Tobacco Factory,Fursungi News,Scented Tobacco SeizedSearch Description:
Pune Crime Branch Unit 5 and FDA raided illegal scented tobacco factory in Fursungi Urali Devachi and seized material worth 31.91 Lakhs.Hashtags:
#PunePolice #CrimeBranch #FDARaid #Fursungi #IllegalTobacco #PuneNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: