पुणे: एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेतून सुटलेला आणि सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराने आपल्या पत्नीच्या साथीने दुचाकी चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्याने तपास करत या वाहन चोरीचा उलगडा केला असून आरोपी वसीम सलीम पटेल (वय ४२, रा. कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेली ७० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली आहे.
किराड आळीतील वाहन चोरी
भवानी पेठेतील किराड आळी येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेली काळ्या रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी खडक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास खडक पोलीस ठाण्याचे तपास पथक करत होते.
बातमीदाराची माहिती अन् कोंढव्यातून अटक
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे आणि अंमलदार हेमंत पेरणे यांना बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली की हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील वसीम सलीम पटेल याने केला आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या सूचनेनुसार पथकाने कोंढवा येथे आरोपीच्या राहत्या पत्यावर धाड टाकून २३ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेतले.
पती-पत्नीने मिळून केला गुन्हा
आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदर दुचाकी चोरीचा गुन्हा स्वतः आणि आपल्या पत्नीने मिळून केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली ७० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा पोलिसांच्या स्वाधीन केली. आरोपी वसीम पटेल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत सन २०२५ मध्ये त्याला पुणे आयुक्तालय आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
पोलीस पथकाचे यश
ही कामगिरी अपर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उपआयुक्त (परिमंडळ १) ऋषिकेश रावले आणि सहाय्यक आयुक्त (फरासखाना विभाग) सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक धनंजय पिंगळे, निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, समाधान पवार, सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे, सहाय्यक उपनिरीक्षक विनोद शिंदे आणि अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, उमेश मठपती, सैपुनमुलुख नदाफ व विकास पांडोळे यांनी केली.
Labels:
Khadak Police Pune,Vehicle Theft Arrest,MPDA Criminal Caught,Pune Crime News,Two Wheeler StolenSearch Description:
Khadak Police Pune arrested externally externed MPDA criminal Wasim Patel for stealing Activa scooter with his wife.Hashtags:
#PunePolice #KhadakPolice #VehicleTheft #PuneCrime #CrimeBranch #PuneNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: