शेतकऱ्यांना अवघे अडीच हजार रुपये देणाऱ्या कर्नाटक सरकारला विरोधक जाब विचारणार का?; नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यांना संतप्त सवाल

 


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मदत म्हणून पाच हजार रुपयांची घोषणा केली आहे, ही मदत अंतिम नसून आगाऊ मदत आहे. मात्र, पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार, असा सवाल करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि रोहित पवार या सर्व विरोधी पक्षीय नेत्यांना एकच सांगायचे आहे की, शेतकऱ्यांसाठी अवघे अडीच हजार रुपये देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला हे नेते जाब विचारणार का? असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कर्नाटक सरकारवर आणि विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना नवनाथ बन यांनी सविस्तर आकडेवारी मांडली. कर्नाटकात दुष्काळ जाहीर केला तेव्हा त्याकडे लक्ष वेधत विरोधक सरकारवर ओरडा करत होते, परंतु कर्नाटकमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फक्त अडीच हजार रुपये देऊन त्यांची थट्टा करण्यात आली, तर महाराष्ट्रात महायुती सरकारने पाच हजार रुपयांची मदत केली आहे. आता अडीच हजार रुपये जास्त की पाच हजार रुपये जास्त, याचे उत्तर काँग्रेस नेत्यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. कर्नाटक सरकारने दिलेली मदत ही एकूण मदत आहे, तर महाराष्ट्रातील सरकारने दिलेली मदत ही तात्पुरती व अग्रिम स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुती सरकार विरोधकांपेक्षा दुपटीने पुढे असून, पंचनामे पूर्ण झाल्यावर एनडीएच्या नियमानुसार हेक्टरी भरीव मदतीची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक प्रशासनाने दुष्काळ निवारणासाठी १ हजार २५० कोटी रुपयांची तरतूद केली होती, तर महाराष्ट्रातील सरकारने ६ हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता तोही अग्रिम स्वरूपात दिला आहे. महाराष्ट्रात चारा छावांसाठी सुमारे ६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, तर कर्नाटकात अवघ्या २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कर्नाटक सरकारने एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नसून केवळ कर्जवसुलीसाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे, तर महायुती सरकारने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करत आजपर्यंत ५८ लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचवली आहे. एवढेच नव्हे तर थकीत वीजबिलापोटी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जात असून त्याची वसुली केली जात नाही. जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे त्यांनी पाच हजार रुपये मदत का केली नाही? किमान महाराष्ट्राने केली तेवढी तरी मदत का केली नाही, याचा जाब कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस विरोधक दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत आणि अभिजीत दीपके यांच्यावरही कडक टीका केली. तिरंगा लावला म्हणून जर का कोणावर कारवाई करायची नसेल, तर मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला होता, तेव्हा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचे साथीदारही त्यांच्या बोटीवर तिरंगा लावून मुंबईत आले होते, त्यावेळेला काँग्रेसचे सरकार होते. आता दहशतवादी तिरंगा लावून आले म्हणून त्यांच्यावर कारवाई करायची नाही का? असा सवाल करत देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे धोरण पाकिस्तान आणि बांगलादेशधार्जिणे असल्याचा आरोप त्यांनी केला. हातात तिरंगा घेऊन या देशाचा बांगलादेश आणि नेपाळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. तिरंगा हा या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे, परंतु तिरंग्याच्या आड या देशामध्ये दहशत आणि अराजकता पसरवणे कधीही सहन केले जाणार नाही, हे संजय राऊत आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी ध्यानात ठेवावे, असा कडक इशारा त्यांनी दिला.

  • Labels: Navnath Ban, BJP Maharashtra, Karnataka Government, Drought Relief, Vijay Wadettiwar, Harshwardhan Sapkal, Sanjay Raut, Abhijit Dipke, Marathi News

  • Search Description: BJP Chief Spokesperson Navnath Ban questioned opposition leaders Vijay Wadettiwar and Harshwardhan Sapkal over the Karnataka Congress government giving only Rs 2,500 to farmers compared to Maharashtra's Rs 5,000 relief.

  • Hashtags: #NavnathBan #BJPMaharashtra #DroughtRelief #KarnatakaVsMaharashtra #VijayWadettiwar #SanjayRaut #PoliticalNews #MarathiNews



शेतकऱ्यांना अवघे अडीच हजार रुपये देणाऱ्या कर्नाटक सरकारला विरोधक जाब विचारणार का?; नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यांना संतप्त सवाल शेतकऱ्यांना अवघे अडीच हजार रुपये देणाऱ्या कर्नाटक सरकारला विरोधक जाब विचारणार का?; नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यांना संतप्त सवाल Reviewed by ANN news network on १०/१५/२०२६ ०३:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".