गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; गुजरात व हरियाणा पोलिसांच्या मदतीने ३ आरोपी जेरबंद

 


पुणे:
पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा कसून तपास करत पुणे पोलिसांनी गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने एका आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १० लाखांच्या कारसह एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास पथकातील सहायक निरीक्षक उमेश कारके व अंमलदार तपास करत असताना, आरोपी हे हरियाणातील पलवल येथील असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासात ते आरोपी गुजरातच्या अरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यात अटक असल्याचे समजले. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी अरवली पोलिसांच्या मदतीने १) अजय समशेर विनोदकुमार रुपसिंग कोळी, २) अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी आणि ३) दीपक समशेर राजुभाई सापसिंग (सर्व रा. हरियाणा) या तीघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गर्दीचा गैरफायदा घेऊन तब्बल ९ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली १० लाख रुपये किमतीची एर्टिगा कार आणि १३ लाख रुपयांचा चोरीचा ऐंशी असा एकूण २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या दोन महिन्यांत गुजरात, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन ६२ गुन्हे उघडकीस आणले असून तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे व रमेश लाहिगुडे यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान गेंड, उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी आणि अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.


  • Labels: Vishrambag Police, Interstate Gang, Pune Crime, Gold Recovery, Pune Police

  • Search Description: Vishrambag Police arrest three interstate accused with the help of Gujarat and Haryana Police, solving 9 theft cases and recovering Rs 23 lakh.

  • Hashtags: #VishrambagPolice #PunePolice #InterstateGang #CrimeNews #Recovery

गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; गुजरात व हरियाणा पोलिसांच्या मदतीने ३ आरोपी जेरबंद गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; गुजरात व हरियाणा पोलिसांच्या मदतीने ३ आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on १०/१५/२०२६ ०४:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".