पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरातील एका इमारतीत अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने धाड टाकून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली असून, एका महिला आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सहकारनगर येथील शकुंतला अपार्टमेन्टमधील बी बिल्डिंगमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पथकाने निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक तयार करून फ्लॅटवर छापा टाकला. कारवाईदरम्यान वेश्यागमनासाठी उपलब्ध असलेल्या एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी संबंधित महिला आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (१), अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४, १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आशालता खापरे, आणि अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, किरण बरडे व वैशाली खेडेकर यांनी केली आहे.
Labels: Anti Human Trafficking Cell, Pune Crime, Sahakarnagar Police, Rescue Operation, POCSO
Search Description: Pune Crime Branch rescues a minor girl from prostitution and arrests a woman in Sahakarnagar raid.
Hashtags: #HumanTrafficking #PunePolice #CrimeBranch #Sahakarnagar #POCSO

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा