गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

भोसरीत २५०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'सेवाज्योती यात्रा' व 'विकसित भारत संकल्पसभा' उत्साहात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑनलाईन मार्गदर्शन


पिंपरी-चिंचवड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्ध, सशक्त आणि 'आत्मनिर्भर भारता'च्या संकल्पनेला नवी गती देण्यासाठी भोसरी येथे भव्य वातावरणात 'सेवा ज्योती यात्रा' आणि 'विकसित भारत संकल्प सभा' उत्साहात पार पडली. '२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा' या ध्येयाने प्रेरित होऊन आयोजित या सोहळ्यात भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह शहर आणि राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या राज्यस्तरीय महासभेला शहरातील २५०० हून अधिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे डिजिटल माध्यमातून झालेले थेट मार्गदर्शन. लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून झालेल्या या संवादातून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जनसेवा, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी योगदान देण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण सभा परिसर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

२५ वर्षांची जनसेवा हीच राष्ट्रसेवेची प्रेरणा: शत्रुघ्न काटे

सभेला संबोधित करताना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांचा प्रवास हा केवळ राजकीय प्रवास नसून, तो या देशाच्या पुनरुत्थानाचा आणि जनसेवेचा महायज्ञ आहे. 'सेवा ज्योती यात्रे'च्या माध्यमातून पेटवलेली ही सेवेची ज्योत पिंपरी-चिंचवडच्या घराघरांत पोहोचवून 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि संकल्प

या प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, सरचिटणीस मधुकर बच्चे, सरचिटणीस वैशाली खाड्ये, सरचिटणीस संजय पटणी, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी राजेश पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यासह शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

'२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा' या संकल्पनेतून जनसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्याचा आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने योगदान देण्याचा संकल्प या प्रसंगी सर्व उपस्थितांनी केला.

  • Labels: BJP Pimpri Chinchwad, Bhosari News, Narendra Modi, Shatrughna Kate, Seva Jyoti Yatra, Vikasit Bharat Sankalp Sabha, Mahesh Landge, PCMC News

  • Search Description: BJP organized Seva Jyoti Yatra and Viksit Bharat Sankalp Sabha in Bhosari with over 2500 workers in attendance and PM Narendra Modi's virtual address.

  • Hashtags: #Bhoasri #PimpriChinchwad #BJP #NarendraModi #ShatrughnaKate #ViksitBharat #SevaJyotiYatra #PCMCNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा