बारामती परिसरात राज्य उत्पादनशुल्क व पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूचे ८ अड्डे उद्ध्वस्त, ७ जणांना अटक
कारवाईदरम्यान पथकाने घटनास्थळावरून ११० लिटर तयार गावठी दारू आणि ५ हजार १८० लिटर कच्चे रसायन जप्त करून ते नष्ट केले. याशिवाय दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावठी दारूच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि या नेटवर्कमध्ये स्थानिक पातळीवर कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता उत्पादन शुल्क विभागाकडून वेगाने सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहसंचालक (कायदा व सुव्यवस्था), विभागीय आयुक्त, पुणे अधीक्षक अतुल कानडे आणि हडपसर विभागाचे उपअधीक्षक गणेश कसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये बारामती, दौंड, सासवड, एच विभाग, पुणे भरारी पथक-२ आणि बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने सहभाग नोंदवला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एम. साबळे, एम. पी. होलम आणि गिरीशकुमार करचे करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील फुगेवाडी परिसरात नुकत्याच घडलेल्या विषारी दारूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने ग्रामीण भागातील तपासणी अधिक तीव्र केली आहे. परिसरात कुठेही अवैध हातभट्टी दारू तयार होत असल्यास अथवा विक्री सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---
- **Labels:** Baramati News, State Excise Department, Crime News, Pune Police, Illicit Liquor Raid, Maharashtra News, Law Enforcement, Baramati Rural
- **Search Description:** State Excise Department and police raided 8 illicit liquor dens in Baramati, seizing materials worth Rs 2.18 lakh. 7 accused arrested.
- **Hashtags:** #Baramati #CrimeNews #ExciseDepartment #MaharashtraPolice #IllegalLiquor #PuneNews #PoliceRaid #AstraNews
Reviewed by ANN news network
on
१०/३०/२०२६ ०८:४१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: