नवी मुंबईतील तळोजा येथे गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना पुण्यात हातकड्या; आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई

 


पुणे: नवी मुंबईतील तळोजा परिसरात आर्थिक व्यवहारातून एकावर पिस्तुलाने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन सराईत आरोपींना आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने पुणे शहरातून ताब्यात घेतले आहे. रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे), अनिकेत प्रताप नरवडे (वय १९, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) आणि सौरभ गोरख चौधरी (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींची नावे आहेत.

दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे तळोजा येथील फेज-२ मधील शिवाजी चौकाजवळ आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करत पिस्तुलाने फायरींग करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालायंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न व आर्म्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी पुणे परिसरात पळून आल्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अंमलदार धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांना मिळाली.

आंबेगाव पोलिसांची यशस्वी सापळा कारवाई

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आंबेगाव पोलिसांनी दत्तनगर परिसरात सापळा रचून तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर व दंडात्मक कारवाईसाठी या तीनही आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरीआयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे,  उपायुक्त मिलिंद मोहिते, सागर कवडे आणि सहायकआयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने,निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक युवराज शिंदे व तपास पथकातील अंमलदारांनी केली आहे.


  • Labels: Ambegaon Police, Taloja Crime, Firearm Shooting, Navi Mumbai Police, Pune Police, Arrest

  • Search Description: Ambegaon Police in Pune arrest three accused who fled after committing a shooting incident over financial dispute in Taloja, Navi Mumbai.

  • Hashtags: #AmbegaonPolice #PunePolice #NaviMumbaiPolice #ShootingCase #CrimeNews #PuneCrime

नवी मुंबईतील तळोजा येथे गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना पुण्यात हातकड्या; आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई नवी मुंबईतील तळोजा येथे गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना पुण्यात हातकड्या; आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई Reviewed by ANN news network on १०/२७/२०२६ ०५:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".