गैरसमजातून विटेने हल्ला करणाऱ्या फरार आरोपीस गुन्हे शाखेकडून बेड्या



पुणे :
भाचीला नांदावयास पाठवत नसल्याच्या गैरसमजातून वाद घालून विटेच्या तुकड्याने हल्ला करणाऱ्या आणि खडक पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट १ ने अटक केली आहे. विवेक उर्फ दांड्या सुरेश अडागळे (वय २१, रा. बालाजी मंदिर शेजारी, नवा वाडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी नवावाडी नानापेठ येथील फिर्यादी यांना आरोपीने भाचीला नांदावयास पाठवत नसल्याचा गैरसमज करून शिवीगाळ केली. तसेच तिथेच पडलेला घराच्या भिंतीचा तुटलेला विटकरीचा तुकडा उचलून फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून त्यांना जखमी केले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११५(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी विवेक अडागळे हा फरार असताना, गुन्हे शाखेच्या युनिट १ कडील अंमलदार विनोद चव्हाण व किरण मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत तो त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या आदेशानुसार खडक पोलिसांकडे खात्री करून, पथकाने दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील कारवाई सुरू आहे.

सदरची कामगिरी अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धिरज राऊत आणि अंमलदार विनोद चव्हाण, किरण मोरे, अतुल साळवे, नागरे, निखिल अहिवळे व सचिन कोळी यांनी केली आहे.

  • Labels: Pune Crime Branch, Khadak Police, Assault Case, Pune Crime, Arrest

  • Search Description: Pune Crime Branch Unit 1 arrests an absconding accused who attacked a person with a brick piece in Nana Peth over a family dispute.

  • Hashtags: #PuneCrimeBranch #KhadakPolice #AssaultCase #PuneNews #CrimeUpdate

गैरसमजातून विटेने हल्ला करणाऱ्या फरार आरोपीस गुन्हे शाखेकडून बेड्या गैरसमजातून विटेने हल्ला करणाऱ्या फरार आरोपीस गुन्हे शाखेकडून बेड्या Reviewed by ANN news network on १०/१५/२०२६ ०४:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".