विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद


पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या एका पाहिजे आरोपीस जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. अभिषेक संजय काळे (वय २७, रा. सर्वे नं. १३४, दांडेकर पूल, लोकमान्य नगर समोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जुलै २०२३ रोजी मांगिरबाबा चौक, दांडेकर पुलाजवळील खराडे वडापाव सेंटरजवळ काही इसमांनी सार्वजनिक रस्त्यावर जमाव जमवून शिवीगाळ करत हाताने व कोयत्याने मारहाण केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भादंवि कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अभिषेक काळे हा मागील तीन वर्षांपासून फरार होता.

गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना अंमलदार बाबा दांगडे व संतोष अनुसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी हा सध्या मॉडर्न कॉलेज परिसरात आला आहे. वरिष्ठ  निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ सापळा रचून दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धिरज राऊत, आणि अंमलदार बाबा दांगडे, संतोष अनुसे, संतोष नागरे व अतुल साळवे यांनी केली आहे.


  • Labels: Pune Crime Branch, Vishrambag Police, Wanted Criminal, Pune Police, Arrest

  • Search Description: Pune Crime Branch Unit 1 arrests a wanted accused absconding for three years in a case registered at Vishrambag Police Station.

  • Hashtags: #PuneCrimeBranch #VishrambagPolice #WantedAccused #PuneNews #CrimeUpdate

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on १०/१५/२०२६ ०३:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".