गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या तीन महिला जेरबंद; तडीपारीच्या आदेशाचा केला होता भंग


पुणे: पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन महिला आरोपींनी तडीपारीच्या आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात वास्तव्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या सर्व्हेलन्स पथकाने कारवाई करत या तीनही महिलांना जेरबंद केले आहे.

दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश नलावडे व पथक हद्दीत गस्त घालून तडीपार आरोपींचा शोध घेत होते. त्यादरम्यान, पोलीस रेकॉर्डवरील तडीपार असलेल्या महिला १) शारदा राजु चव्हाण (वय ४५), २) लक्ष्मी देवी राठोड (वय ४५) आणि ३) अनुसया निलेश राठोड (वय ३२) या लक्ष्मीनगर हद्दीतील त्यांच्या राहत्या घरजवळ मिळून आल्या. या महिलांनी पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) यांच्याकडील तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी अपर आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, निरीक्षक (गुन्हे) अमर कदम, तपास पथकाचे अधिकारी निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे, महेश नलावडे आणि अंमलदार प्रदिप चव्हाण, लहू गडमवाड, शाम शिपणे व रूपाली टोपे यांनी केली आहे.


  • Labels: Laxminagar Police, Pune Crime, Exiled Criminals, Police Action, Pune Police

  • Search Description: Laxminagar Police arrest three women who violated externment orders and returned to Pune district.

  • Hashtags: #LaxminagarPolice #PunePolice #ExternmentBreak #CrimeNews #PuneCity

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा