पुण्यातील कल्याणीनगर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक, दोन महिलांची सुटका


पुणे: पुणे शहरातील कल्याणी नगर आणि येरवडा परिसरात फोनवरून बुकिंग घेऊन लॉजेसवर अनैतिक व्यापारासाठी महिला पुरवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, दलदलीत ढकलण्यात आलेल्या दोन पीडित महिलांची सुखरूप सुटका केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) राज राजेशाम सविता (वय २८, रा. खराडी, पुणे) आणि २) सुनील शिवाजी शिंदे (वय ३७, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) अशी आहेत.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना गस्त घालताना पोलीस अंमलदार रामेश्वर नवले यांच्यामार्फत गुप्त माहिती मिळाली होती. येरवडा येथील एका हॉटेलमध्ये काही इसम ग्राहकांना फोनवरून संपर्क साधून आणि विशिष्ट रक्कम ठरवून कल्याणी नगर व येरवडा परिसरातील लॉजेसवर अनैतिक व्यापारासाठी मुली पाठवत असल्याची ती बातमी होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बातमीची शहानिशा केली. पोलिसांच्या पथकाने येरवड्यातील संबंधित हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक (Dummy Customer) पाठवून पाळत ठेवली व खात्री पटताच छापा टाकला. या छाप्यात अनैतिक व्यापारास प्रवृत्त केलेल्या २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

पीडित महिलांकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय चालवणाऱ्या आरोपींची माहिती दिली. त्याआधारे तपास पथकाने अप्पर खराडी रोड परिसरात सापळा रचून राज सविता आणि सुनील शिंदे या दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी १४ सप्टेंबर २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(ल)(३), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलम ४ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४ चे उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, येरवडा विभागाचे सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ निरीक्षक उमेश गिते,  निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे व केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  निरीक्षक शरद देठे,  उपनिरीक्षक किशोर बेरड, अंमलदार रामेश्वर नवले, कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर दळवी, लक्ष्मण ठोकळ, नितीन चांदणे, नागेश कुंजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, संदीप धादवड आणि  ज्योती नाईक यांनी केली.


  • Labels: Sex Racket Busted, Yerwada Police, Pune Crime News, Kalyani Nagar, Human Trafficking, PITA Case

  • Search Description: Yerwada Police bust sex racket operating in Kalyani Nagar and Yerwada; arrest 2 and rescue 2 women.

  • Hashtags: #YerwadaPolice #PuneCrime #KalyaniNagar #SexRacketBusted #PITA Act #PuneNews

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक, दोन महिलांची सुटका पुण्यातील कल्याणीनगर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक, दोन महिलांची सुटका Reviewed by ANN news network on ९/१८/२०२६ ०९:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".