ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून भरली विद्यार्थ्यांची फी!;श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचा सामाजिक उपक्रम

 


पुणे : गणेशोत्सवातील पारंपरिक जल्लोषाला सामाजिक बांधिलकीची जोड देत श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग यांनी यंदाच्या उत्सवाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने केली आहे. ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून उपलब्ध निधीतून नु. म. वि. प्रशालेतील ६ विद्यार्थ्यांचे वार्षिक शालेय शुल्क भरून मंडळाने उत्सवातून समाजासाठी योगदान देण्याचा संदेश दिला.

मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शालेय शुल्क प्रदान करताना आमदार हेमंत रासने, राघवेंद्र मानकर, सागर सुनील दहीभाते, कुणाल टिळक आणि प्रशांत यादव आदी उपस्थित होते. यंदा मंडळाचे ६१ वे वर्ष असून त्यानिमित्त भव्य गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विश्रामबागवाड्यासमोरून तुळशीबागेत जाणाऱ्या गल्लीच्या प्रारंभी असलेल्या मंडळाच्या भव्य सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.


उत्सवाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने करणाऱ्या मंडळाने पर्यावरण संवर्धनासाठीही उपक्रम राबविला आहे. परिसरातील व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या ग्लासातून चहा न पिण्याचा केवळ सल्ला न देता त्यांना स्टीलचे ग्लास देण्यात आले. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.


तुळशीबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक आणि पारंपरिक व्यावसायिकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारण्यात आल्याचे मंडळाने सांगितले. दरम्यान, ‘पुणे परिवार’कडून मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.


४० फूट ‘गिरीकंधरा’ देखावा

श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबागकडून यंदा ‘गिरीकंधरा’ हा ४० फूट उंच देखावा सादर करण्यात येणार आहे. देखाव्याचे प्रमुख आकर्षण ११ फुटांचे ध्यानस्थ हनुमानाचे हवेत तरंगणारे रूप असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणाऱ्या या अनुभवातून भाविकांना पर्वताच्या अंतरंगातील अद्भुत विश्व, रामायणकालीन प्रसंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम पाहता येणार आहे.

याशिवाय १ ते ५ वर्षे वयोगटातील ५,००० बालभक्तांना ‘हनुमान अस्त्र’ म्हणून गदा वाटप करण्यात येणार आहे. हनुमानाच्या शौर्य, भक्ती आणि संस्कारांची ओळख बालमनाला व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंडळाने सांगितले आहे.

Labels:

Ganeshotsav 2026, Pune Ganeshotsav, Tulshibaug, Gajanan Mandal Trust, Social Initiative, Student Education, Environmental Conservation, Ganpati Festival, Girikandhara, Hanuman, Pune News

Search Description:

Shri Gajanan Mandal Trust Tulshibaug in Pune reduced dhol pathak and other festival expenses to pay annual school fees for six students, while also promoting environmental conservation and presenting the 40-foot Girikandhara Ganeshotsav attraction.

Hashtags:

#Ganeshotsav2026 #PuneGaneshotsav #Tulshibaug #GajananMandal #SocialInitiative #StudentEducation #EnvironmentalConservation #GanpatiFestival #Girikandhara #Hanuman #PuneNews



ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून भरली विद्यार्थ्यांची फी!;श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचा सामाजिक उपक्रम ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून भरली विद्यार्थ्यांची फी!;श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचा सामाजिक उपक्रम Reviewed by ANN news network on ९/०८/२०२६ ०५:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".